Thursday, February 9, 2017

काय मित्रा बरा आहेस ना ?


काय मित्रा बरा आहेस ना ? 

[27/01/2017] (9977682021)
           - योगेश देसले

काय मित्रा बरा आहेस ना,
हास्याची गोळी घेतोयस ना ।
किती ही असल्या कटकटी मागे,
तरी मन भरून जगतोयस ना  ।।

आला होतास रडत मजंपाशी,
काय करू म्हणे आहे ऊपाशी  ।
खळगी भरते रोज तुपाशी,
हास्याची गोळी न कुणापाशी  ।। 

किती निराश वाटत होतास,
पोट भरूनही कन्हत होतास  । 
रोज म्हणे यंत्रांसोबत असतो,
बोलायला कोणी माणुस नसतो  ।। 

कुढत बसतो रोज स्वतःशी,
जेवून सुद्धा आहे ऊपाशी  ।
सांगत होतो तुला,
जमिनीवर ये थोडा  ।। 

पैशाचा माज कर बाजुला,
माणसा परी वाग जरा ।
असशील मोठ्या पदावर,
उंच-उंच शिखरावर  ।। 

पण विसरू नकोस सत्य हे,
शेवटी मातीच व्हायचय  ।
चार खांद्यांवर जायचय,
सरणावरच चढायचय  ।।

भरल्या डोळ्यांनी आला होतास,
मलाही शिकवून गेला होतास  ।
औषध काही मागत होतास,
किती आशेने पाहत होतास  ।।

जातांना मात्र हसला होतास,
डोळे पुसून गेला होतास  ।
न जाणे आज कसा आहेस,
कोणत औषध घेतो आहेस  ।।

म्हणुन विचारतो हसतोयस ना,
हास्याची गोळी घेतोयस ना.......?
           - योगेश देसले

यज्ञ

योगेश देसले


        यज्ञ 
[23/01/2017] (9967682021)
          - योगेश देसले

मला तेथे तू भेटावा,
यज्ञ जेथे फोल व्हावा  ।। धृ ।।


बोचलेल्या वेदनांना,
अलगद फुंकताना,
ऊरी काटा खुपसावा  ।। 1 ।।

माजलेल्या तुफानांना,
रित्या हाती झेलताना,
एक वार खोल व्हावा  ।।  2 ।।


शिखरे ही चढतांना,
पाय पुढे टाकतांना,
मार्ग एक पलटावा  ।।  3 ।।


सागराला चिरतांना,
घोट-घोट घोटतांना,
एक अश्रृ ओघळावा  ।।  4 ।।


आव्हानांना पेलतांना,
बाहू जिद्द फाकतांना,
एक श्वास मंद व्हावा  ।।  5 ।।
             - योगेश देसले

रुसवा

                   

                   रुसवा

[24/10/2016] (9967682021)
                   - योगेश देसले
काळजाचा छेदं करूनी तू गेली का अशी,
पाहिली ऊगाच स्वप्न मी ही का अशी ।

काय गुन्हा काय भूल काय चूक घडली,
ज्याची येवढी मोठी मजं सजा तू दिली ।

जोपासतो मी हा छंद कयास करुनी,
तुझ्या परतीची मनी आस धरूनी ।

शोधू कसा तुला तू गं रात चादणी,
कविराज छेडतो ती राग रागिणी ।

न पुन्हा कधी भेटण्याचा करशी बहाणा,
सांग कसा जगेल हा तुझा दिवाणा ।

कोण जाणे पुन्हा रुप-रंग फिरावा,
येऊनं अलगद घेशी मिठीत विसावा ।

अश्रृ डोळा दाटवून खूप रूसावी,
चुंबताच माथा खुदकन हसावी ।

मोहरून प्रितीची कळी खुलावी,
जणु अंगणात जाई-जुई फुलावी ।

Yogesh